भूक

फांदी गुलाबाचं फुल

कसं हासतं पानातं

माय वेचिती कापूस

लाही झालेल्या रानात..

बाप तापल्या रानात

कसा भिजवतो फाटा

आग होऊनी पोळतो

त्याच्या पाया फुपाटा

पिकं होती गं हिरवे

सारं शिवार बोलतं

सारे बापाचे आभारी

पान – पान हालतं..

सारं कष्टाचंच जीणं

नाही घडीभर सुख..

काळ होऊनिया येती..

वेळो वेळीची ती भूक

Photo Courtesy of World Bank Photo collection

Follow Us on Facebook

1 thought on “भूक”

Leave a Reply