भाकरीचा शोध

भुकेच्या आगडोंबामुळे मी…

भाकरीच्या शोधात निघालो..

ते कुत्र्यांच्या पिल्यांनाही

फॅरेक्स अन् पार्लेजी चारतात

हे मी ऐकूनच होतो…

त्या दिवशी मी डोळ्यांनी पाहिलं

ते माझ्याकडे पाहून हसले अन्

म्हणाले…

चू..चू..चू..चू..

मी पुन्हा पेटलो अन् सांगितलं

तुझ्याकडे पैसा असेल

माझ्याकडे रक्त आहे

आटविन मी त्याला भाकरीसाठी

भुकेची आग विझविण्यासाठी

ते नुसते विरस्काराने पाहत होते

मी मात्र झपाट्यानं निघालो

भाकरीच्या शोधात

Follow Us on Facebook

Leave a Reply