घास

दिवसभर सूर्य तापून गेला..

चंद्र ही हळू ऊगवला..

घामाचा लोंढा नाही अजून सरला

नको पुसू पटकरानं सये,

त्याला धुवाय सोड्या लागतंय

ते मी कशानं आणू?

कालपासून बाळ बिस्कुट मागतंय..

दिवसभराच्या कामानंतर

तूच माझी समज काढते..

हात घेऊन हातामध्ये

दोन आश्रू त्यावर टाकते

नसेल जेंव्हा कुटका टोपलीत

सोनुल्याला बागुलबुवा सांगुन

झोपावनं तुलाच जमतं..

तेंव्हा, डोळ्यातील पाणी माझ्या,

प्रेमापुढं तुझ्या नमतं

Follow Us on Facebook

Leave a Reply