घरटं

चिमणीच्या खोप्याकडे पाहून

तू म्हणालीस……

एक घरटं असच हवंय

काडी, काडीने गवताच्या

त्याने विणलेल घरटं

दोघांच्या दोन चोंची

पुढच्या पिढीची धडपड

जन्माची कट कट

मधेच सापाचे डोकावणे

अन कावळ्याच ओरडणे

कस जपतील ग सये ते बाळांना

त्यामुळे सये,

घरट्याआधी सापाची बिळ

अन कावळ्याच ओरडण

बंद करायला हव.

Photo Courtesy of Baya Weavers

Follow Us on Facebook

Leave a Reply