अश्रुंचे प्रेतगीत

मी कोण आहे? कसा आहे?

कुठे आहे?

या बद्दल तुम्ही आता मुळीच वाद घालू

नका मी खूप – खूप दूर गेलोय..

आता कुणी साद घालू नका..

हे खरं आहे की,

तुम्ही उठवलेल्या वादळातील

मी एक कण होतो..

जो दांभिकांच्या डोळ्यात खुपला..

आता उगीच..

बेगडी गाण्याला..

लटकी दाद देऊ नका..

नका कोणी आता इथं..

माझ्या अस्तित्वाचं गाणं गाऊ

कारण..

मिच गात आहे आता

माझ्या निष्कारण सांडलेल्या

अश्रुंचे प्रेतगीत

Photo Courtesy of Getty Images

Follow Us on Facebook

1 thought on “अश्रुंचे प्रेतगीत”

Leave a Reply