अधीर

धीर कशास देऊ कोण?

मिच अधीर हरणी…

आकाश माझा पिता अन

माता माझी धरणी

सुने झाले हे शिवार माझे

वणवा लाविला कोणी?

तनामनातून आज जळती

इथे माझ्या भगिनी

सुसाट वारे, आग उन्हाची

चाल वैऱ्याची कोण करी…

पिसाट अशी भांबावलेली

मारीन पेंजा उरी

भिऊ आता मी कशास कोण…

मरण हे माझे मला कळाले

देईल सारी वस्ती पेटवुन

जरी त्यात घर माझे जळाले

Follow Us on Facebook

Leave a Reply